Search This Blog

Thursday, 3 April 2025

आशा दिन व जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव




 

आशा दिन व जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव

चंद्रपूरदि.3 एप्रिल:    तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहजि.प. येथे (आशा) दिवस व जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला, ‍विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख अतिथी म्हणून एकात्म अभियानाचे अमर सिंग राठोडसुष्मा सिंगतालुका आरोग्य अधिकारी  डॉ. कोमल मुनेश्वरशितल राजापूरेवैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पडगीलवारडॉ. प्रशांत चौधरीविस्तार अधिकारी मुरलीधर नन्नावरे आदी उपस्थित होते.

वर्षभरात आशा स्वयंसेविका योजना व क्षयरोगाबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकागटप्रवर्तक यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात  आला. आरोग्याच्या रणरागिणी अहोरात्र आरोग्य विषयक कार्य करीत असतातअसे मान्यवरांनी आशा स्वयंसेविकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमात एकात्म अभियानाचे समन्वयांमार्फत  हार्टफुलनेस सत्र आयोजित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात गित गायननृत्यपथनाट्य असे विविध कलाकृती आशा स्वयंसेविकांनी सादर केली.तसेच क्षयरोग दिनानिमित्त रांगोळी स्पर्धानिंबध स्पर्धा चित्रकलाराष्ट्रीय क्षयरोग विषयावर एकपात्री अभिनय स्पर्धा  घेण्यात आली. सर्व विजयी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक व  विद्यार्थ्यांना भेट वस्तु देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कोमल मुनेश्वर  यांनी केले.  संचालन दीक्षा फुलझेले यांनी तर आभार आम्रपाली दुर्योधन यांनी मानले. यावेळी आरोग्य अधिकारीआरोग्य सहाय्यक स्त्रि/ पुरुषआरोग्य सेविकास्टॉफ नर्स  व तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी उपस्थित  होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.के राठोडसुरेश कुंभारे,  डॉ. प्रियंका उपरे,  जयांजली मेश्रामखिरेंद्र पाझारेसंदीप मुनप्रणल मुन तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

000000000

No comments:

Post a Comment