Search This Blog

Monday, 28 April 2025

29 एप्रिल रोजी विभागीय स्तरावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

 

29 एप्रिल रोजी विभागीय स्तरावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर,दि.28 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत प्रादेशिक उपायुक्तसमाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयात 29 एप्रिल,  2025 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत सामाजिक न्याय विभागाशी संबंधित तक्रारीचे निराकरण करण्याच्या उद्देशाने विभागीय स्तरावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांना समाजकल्याण विभागाशी संबंधित काही तक्रारीसमस्याअडचणी असेल तर त्यांनी खाली दिलेल्या लिंकशी जोडून आपल्या तक्रारी सांगावेसदर तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यात येईलअसे आवाहन प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

तक्रारीकरीता लिंक :- https://meet.google.com/fjw-fkhh-mzo

००००००

No comments:

Post a Comment