मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणमध्ये दुरुस्ती करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि, 28 एप्रिल : सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत, परंतु त्यांचे आधार प्रमाणीकरण मध्ये दुरुस्ती असल्यामुळे त्यांच्या बैंक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. अशा लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण दुरुस्ती करण्यासाठी सामाजिक न्याय पर्व कार्यक्रम 24 ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांनी आधार प्रमाणीकरण मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००००

No comments:
Post a Comment