Search This Blog

Tuesday, 22 April 2025

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 करिता अर्ज करण्याचे आवाहन

 

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 करिता अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल

चंद्रपूरदि२२ :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय,  पुणेच्या वतीने  सन २०२३-२४ या वर्षातील  जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवकयुवती व नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्हयातून वैयक्तिक स्वरुपात एक युवकएक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना प्रत्येकी रोख  १० हजार रुपये गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे असून या पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवक व युवती यांचे वय १ एप्रिल २०२३ रोजी १३ वर्ष पूर्ण व ३१ मार्च २०२४ रोजी ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. तसेच संस्था हया सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेकरिता पुरस्काराचे स्वरुप रोख  ५० हजारगौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

             तरी चंद्रपूर जिल्हयातील जास्तीत जास्त युवकयुवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून अथवा www.maharashtra.gov.in (संकेतांक २०१३१११२११२२०४३३२१) या संकेतस्थळावरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १२ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेला विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा.  तसेच आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दिनांक २७/०४/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयजिल्हा क्रीडा संकुलसिव्हिल लाईनचंद्रपूर येथे सादर करावेतअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी   अविनाश पुंड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे संपर्क साधावा.

0000000

No comments:

Post a Comment