Search This Blog

Wednesday, 9 April 2025

कोळसा पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा

 

कोळसा पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा

Ø अंतिम अधिसुचना शासकीय राजपत्रात प्रसिध्द

चंद्रपूर, दि. 9 एप्रिल : महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) यांच्या कलम 4 पोटकलम (1) च्या परंतुकाखाली राज्य शासनाने दिलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मुल तालुक्यातील नवीन कोळसा हे गाव महसुली गाव म्हणून घोषित केले आहे. याबाबत अंतिम अधिसुचना शासकीय राजपत्रात 9 एप्रिल 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

मौजा नवीन कोळसा पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा देण्याबाबत 19 मार्च 2025 रोजी जिल्हाधिका-यांमार्फत प्रारुप अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली होती. याबाबत कोणाच्या हरकती व सुचना असेल तर त्या 4 एप्रिल 2025 पर्यंत सादर कराव्यात, असे प्रारुप अधिसुचनेत नमुद होते. त्यानुसार आज 9 एप्रिल 2025 रोजी कोळसा पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा घोषित करण्यात आला आहे. मुल तालुक्यात 1 गाव वाढल्यामुळे मूल तालुक्यातील गावांची संख्या 113 झाली असून चंद्रपूर तालुक्यातून 1 गाव कमी झाल्यामुळे चंद्रपूर तालुक्यात आता 101 गावे आहेत.

०००००

No comments:

Post a Comment