Search This Blog

Wednesday, 9 April 2025

पालकमंत्री साधणार नागरिकांशी संवाद


 

पालकमंत्री साधणार नागरिकांशी संवाद

Ø 12 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 9 एप्रिल : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 12 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.  

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता वन अकादमी येथे मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृती आराखड्याबाबत आढावा बैठक, दुपारी 3 वाजता इरई नदी संदर्भात बैठक, दुपारी 4 वाजता नियोजन भवन, पालकमंत्री यांच्या दालनात नागरिकांशी संवाद, सायंकाळी 6 वाजता महाकाली मंदीर येथे दर्शन व त्यानंतर सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

००००००

 

No comments:

Post a Comment