Search This Blog

Tuesday, 29 April 2025

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि बालकल्याण समितीची आढावा बैठक

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षचाईल्ड हेल्पलाईन आणि बालकल्याण समितीची आढावा बैठक

चंद्रपूरदि.29 एप्रिल : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षचाईल्ड हेल्पलाईन आणि बालकल्याण समिती  बाल न्यायमंडळची त्रैमासिक आढावा बैठक पार पडलीयावेळी त्यांनी जिल्ह्यात बाल सुरक्षा,बालशोषणबालविवाहबालकामगार सारख्या समस्यांना गांभिर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेजिल्हा महिला  बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी बैठकीचा उद्देश  त्रैमासिक आढावा सादर केला.

सदर बैठकीला निवासी जिल्हाधिकारी दगडू कुंभारजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेकौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमेबालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकरसदसय्‍ मोहितकरदेशमुखदिवाकर महाकाळकरजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच पोलिस विभागमनपा चंद्रपूरकामगार कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी क्षमा बासरकर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका पोलिस स्टेशन येथे बालस्नेही पोलिस मदत केंद्र स्थापन करणे तसेच शासकीय रुग्णालयचंद्रपूर येथे बालस्नेही वॉर्ड (कोपरातयार करण्याबाबतचा प्रस्ताव मांडलाया प्रस्तावाबाबत चर्चा करून पोलिस विभाग तथा आरोग्य विभाग यांनी योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्यातसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांना बालस्नेही पुरस्कार  विविध विकास निर्देशांकात चंद्रपूर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

००००००

No comments:

Post a Comment