Search This Blog

Saturday, 26 April 2025

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये बुद्ध पौर्णिमेला होणार निसर्ग अनुभव उपक्रम


 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये बुद्ध पौर्णिमेला होणार निसर्ग अनुभव उपक्रम

चंद्रपूरदि. 26 एप्रिल : वाघ व इतर वन्यजींवाच्या हमखास दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत 12 मे 2025  ला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम निसर्गप्रेमीसाठी राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूरमूलमोहर्लीखडसंगीपळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील 50 मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. निसर्ग प्रेमीकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे.

या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी 28 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत http://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर बुकिंग सुरु होणार असून एकूण 100 निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती 4500 रुपये इतके शुल्क आकरण्यात येणार आहे.

सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत 1500 रुपये अदा करून भरलेल्या रकमेची पावती सबंधित पर्यटन गेटला दाखवावी. उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क  2 हजार रुपयेपर्यटन गेट ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क  1 हजार रुपये इतके सबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे.

सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्चलाईटला सदर उपक्रमामध्ये परवानगी नाही. इतर माहितीकरिता वरील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी.

सदर उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेस श्री. सुमित कोहळे8421461698 (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापकउपसंचालक बफर कार्यालयताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा.

0000000


No comments:

Post a Comment