Search This Blog

Wednesday, 9 April 2025

सामाजिक न्याय समता सप्ताह व न्याय पर्वाचे उद्घाटन

 

सामाजिक न्याय समता सप्ताह व न्याय पर्वाचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 9 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी पर्वावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय समता सप्ताह व सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण येथे पार पडले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक लेखाधिकारी दीपक धात्रक तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडेपुनम आसेगावकरबहिरमवार मॅडमएस. ए. लक्कावार यांची उपस्थिती होती. 8 ते 14 एप्रिल पर्यंत समता सप्ताह आणि 11 एप्रिल ते 1 मे पर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरे केले  जाणार आहे. यामध्ये संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा फुले जयंतीदिनी 11 एप्रिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 14 एप्रिल रोजी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये जाऊन सामाजिक न्याय व बार्टीच्या योजनांची माहिती देणेज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजनसफाई कर्मचाऱ्यांसाठी जनजागृतीपर कार्यशाळादादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची कार्यशाळाअनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, आई-वडील व जेष्ठ नागरिक चरितार्थ कल्याण अधिनियमजादूटोणाविरोधी कायदा व प्रचार अधिनियमवर आधारीत कार्यशाळा व प्रात्यक्षिकतृतीयपंथीयाच्या कल्याण व हक्काच्या संरक्षणाकरीता जनजागृती तसेच तृतीयपंथीयांचे आरोग्य शिबिरविविध महाविद्यालयामध्ये स्थापित असलेल्या समान संधी केंद्रांमध्ये नशा मुक्ती अभियान व व्यसनमुक्ती वर प्रबोधनशाळामहाविद्यालय व शासकीय वसतिगृहामध्ये विविध स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या पर्वात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी केले तर आभार संदीप रामटेके यांनी मानले. यावेळी समतादुत उपेंद्र वनकर यांनी संविधान गीत सादर केले.

००००००

No comments:

Post a Comment