Search This Blog

Monday, 28 April 2025

माथाडी कामगार मंडळात सदस्य पदासाठी अर्ज आमंत्रित

 

माथाडी कामगार मंडळात सदस्य पदासाठी अर्ज आमंत्रित

Ø अंतिम मुदत 10 मे 2025 पर्यंत

चंद्रपूरदि, 28 एप्रिल  उच्च न्यायालयाच्या प्राप्त निर्देशानुसारमाथाडी अधिनियमाच्या कलम 6 अन्वये चंद्रपूर गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ गठीत करण्याचे शासनाचे नियेाजन आहे.  या मंडळावर सदस्य  म्हणून कामगार/मालक प्रतिनिधी यांची नेमणुक करण्याकरीता इच्छुक पात्र व्यक्तीकडून 10 मे 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यरत इच्छुक मालक आस्थापना त्यांच्या असोसिएशन्स व मालकांचे प्रतिनिधित्व करू इच्छिणा-या व्यक्ती तसेच असंरक्षित कामगारत्यांच्या संघटना व असंरक्षित कामगारांचे प्रतिनिधीत्व करू इच्छिणा-या कामगारांनी आपले अर्ज नामानिर्देशीत व्यक्तीबद्दलच्या शिफारशीसंबधितांचे पूर्ण नाव, पत्ता व चारित्र्य पडताळणी दाखला तसेच माथाडी कामगार क्षेत्रातील कार्यअनुभव इत्यादी तपशिलांसह 10 मे 2025 पूर्वी प्राप्त होतील अशा पध्दतीने सादर करावेत

             मंडळास प्राप्त झालेल्या अर्ज व शिफारशीमधुन योग्य त्या व्यक्तीची निवड करून मंडळ सदस्यपदी नेमणुक करण्याचा अधिकार शासनाला आहेकोणत्याही व्यक्तीचा अर्जनामनिर्देशित व्यक्तीची शिफारस कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार शासनाकडे राहीलअसे  चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळचंद्रपूर यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment