Search This Blog

Friday, 11 April 2025

जयभीम पदयात्रेकरीता रॅलीत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 

जयभीम पदयात्रेकरीता रॅलीत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 11 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनचंद्रपूर महानगरपालिकाशालेय शिक्षण व क्रीडा विभागजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कीडा संकुल येथून 13 एप्रिल 2025 रोजी ला सकाळी 6.30 वाजता जयभीम पदयात्रा निघणार आहे.

              या पदयात्रेचा मार्ग जिल्हा क्रीडा संकूल- डॉ. आंबेडकर महाविद्यालय चौक-पवनसूत दवा बाजार-पाण्याची टाकी, परत वरोरा नाका चौक-जिल्हा क्रीडा संकूल याप्रमाणे असेल. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधीजिल्हाधिकारीपोलिस अधिक्षकमुख्य कार्यकारी अधिकारीआयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्यासह नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.

            डॉ. बाबासाहेबांनी भारताला सर्वोत्तम राज्यघटना दिली. त्यांच्या दूरदष्टीचा व कार्याचा गौरव करण्याकरीता जास्तीत जास्त नागरीकविविध सामाजिक संघटनाक्रीडा मंडळेशैक्षणिक संस्थाक्रीडा शिक्षकखेळाडू व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment