Search This Blog

Wednesday, 9 April 2025

‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज पाच दिवस बंद

 

आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज पाच दिवस बंद

चंद्रपूर, दि. 9 एप्रिल : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आपले सरकार’ पोर्टलवरून प्रदान केल्या जातात. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतनासाठी दिनांक 10 एप्रिल  ते 14 एप्रिल 2025 असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहील. या काळात  कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत.

राज्यातील सर्वसामान्य नागरिकग्रामीण आणि शहरी भागातील आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालकसंबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. या कालावधीत आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाहीअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment