Search This Blog

Thursday, 24 April 2025

अवैधरित्या चालणाऱ्या बालगृहांची माहिती द्या

 

अवैधरित्या चालणाऱ्या बालगृहांची माहिती द्या

Ø महिला व बालविकास विभागाचे आवाहन

         चंद्रपूरदि, 24 एप्रिल : आपल्या परिसरात अनाधिकृत छात्रावास, अनाधिकृत बालगृहबालकांचे निवासी संस्था सुरु असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री नंबरवर तसेच महिला व बाल विकास विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

परिसरात अनाधिकृत बालगृह व छात्रावास सुरु असेल तर तात्काळ टोल फ्री नंबर 1098 ला माहिती द्यावी व  बाल शोषण रोखण्याकरीता सहकार्य करावेपुणे जिल्ह्यात आळंदी आणि ठाणे जिल्ह्यात खडवली येथे विनापरवानाअनाधिकृत बालगृहछात्रावास आणि अनाथालय चालवण्यात येत असल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून समोर आल्या आहेत. या ठिकाणी बालकांना इच्छा नसताना ठेवले जाते व त्यांचे शारिरीकमानसिक आणि लैंगिक शोषण झाले आहेहे प्रकरण खुप गंभीर आहेबाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षणअधिनियम 2015 व संशोधित अधिनियम 2021 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 चे उल्लंघन आहेया अधिनियम मधील कलम 42 नुसार अशा संस्थाना आवश्यक मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहेविना नोंदणी प्रमाणपत्र बालगृह/संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष कारावास आणि कमीतकमी लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

            त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात व क्षेत्रात असे अनाधिकृत बालकांच्या संस्था/बालगृह व छात्रावासबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीजिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर 1098 वर माहिती देवून बालकांचे शोषण थांबविण्यास मदत करावीअसे आवाहन आयुक्त नयना गुंडे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत यांनी केले आहे

००००००

No comments:

Post a Comment