Search This Blog

Tuesday, 2 September 2025

3 सप्टेंबर रोजी अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा


सप्टेंबर रोजी अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा

चंद्रपूरदि. 2 :  अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारीत धोरणानुसार मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत अनुकंपा उमेदवारांचा मेळावा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजतापासून नियोजन भवन येथे आयेजित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे

००००००

Monday, 1 September 2025

5 व 6 सप्टेंबर रोजी शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल


व सप्टेंबर रोजी शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल

Ø ईद-मिलाद आणि गणपती विसर्जन मिरवणूक

चंद्रपूरदि. 1 : चंद्रपूर शहरात सप्टेंबर रोजी ईद--मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली तसेच सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

ईद--मिलाद निमित्त सप्टेंबर रोजी सकाळी वाजतापासुन दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी खालीलप्रमाणे वाहतूक वळविण्यात आली आहे.

1. कोहिनूर ग्राउंड-दस्तगीर चौक -मिलन चौक-गांधी चौकजयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौकजटपुरा गेट-कस्तुरबा रोडने कोहीनुर ग्राउंड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहेतसेच सदरचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे. 2. नागपुरकडुन शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून)) घुटकाळाश्री टॉकीजपठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगरसंत केवलराम चौकसेंट मायकल स्कुलसवारी बंगला चौक नगिनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील. 3. शहरातील नागरिकांनी नागपुरवणीघुग्घुसगडचांदूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रहमतनगरनगिनाबाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट- रहेमत नगरदाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. 4. बल्लारशा व मुलकडुन येणा-या वाहनांना (जड वाहने वगळून)) शहरामध्ये जायचे असल्यास बसस्टॅड-एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोलपंप कडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.

गणेश विसर्जनानिमित्त बदल : 6 सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक निघणार आहेया मिरवणुक मार्गावर देखावे पाहण्याकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असतेत्यामुळे प्रियदर्शनी चौक - जटपुरा गेट-कस्तुरबा चौक - गांधी चौक - जटपुरा गेट - रामनगर - संत केवलराम चौक- ईरइ नदी (रामसेतू पुलया मुख्य मिरवणुकीच्या मार्गावरील रहदारीमध्ये सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता पासून ते सप्टेंबर रोजीच्या सकाळी 6 वाजेपर्यंतच्या शहरातील वाहतुक खालीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे.

1. गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा पार पड़ेपर्यत प्रियदर्शनी चौक - जटपुरा गेट-कस्तुरबा चौक - गांधी चौक - जटपुरा गेट - रामनगर रोड - संत केवलराम चौकईरइ नदी (रामसेतू पुलहा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे. 2. नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने हे प्रियदर्शनी चौककडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डान पुलसावरकर चौक ते बंगाली कॅम्पमुल किंवा बल्लारशाकडे जातील. 3. मुल किंवा बल्लारशा कडुन नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प -सावरकर चौक -वरोरा नाका -नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूरकडे जातील.

4. नागपूरकडून शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळूनछोटा नागपुर मार्गे दाताळा चौक-देवाळा गांव-चोराळा टी पॉईट वरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेट मधून शहरात प्रवेश करतील. 5. शहरातील नागरिकांनी नागपुरवणीघुग्घुसगडचांदुरकडे जाण्याकरीता रहमत नगरनगीनाबाग व इतर परिसरातुन जाण्यासाठी बिनबा गेट- चोराळा-दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. 6. बल्लारशा व मुल कडुन येणा-या सर्व वाहनांना (जड वाहने वगळूनशहरामध्ये जायचे असल्यास बस स्टॅड-एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातुन शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंप कडुन बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.

ही ठिकाणे आहेत नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन : 1. जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत 2. जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे रामसेतू पुलपर्यंत 3. जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकपर्यंत 4. कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट 5. कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत 6. गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळपर्यंत 7. कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक 8. दस्तगीर चौक ते मिलन चौक 9. मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज 10. हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्सपर्यंत 11. मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज 12. छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीर.

नो-पार्किंग व नोहॉकर्स झोन म्हणुन घोषित केल्याने मिरवणुक व वाहतूक मार्गावर नागरिकांनीव्यवसायिकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग/उभी करू नयेमुख्य मिरवणुक मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना स्वतःची पार्किंगकरीता जागा नसल्यास त्यांना आपली वाहने 1) जुबली हायस्कुलचे  पटांगण 2) महानगरपालीकेच्या बाजुला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करावी.

इतर ठिकाणांवरून येणा-या नागरिकांसाठी येथे आहे पार्किंग व्यवस्था : 1. चांदा क्लब ग्राउंड 2. डॉबाबासाहेब आंबेडकर कॉलेजवरोरा नाका 3. सेंट मायकल हायस्कुलनगीनाबाग 4. सिंधी पंचायत भवनसंत केवलराम चौक जवळ रामनगर 5. व्यायाम शाळा ग्राउंडपठानपुरा चौक 6. डी.एडकॉलेज ग्राउंड बाबुपेठ 7 महाकाली मंदीर ग्राउंडचंद्रपुर

जुलूस रॅली तसेच विसर्जन मिरवणूक काढणा-या सर्व मंडळांनी तसेच नागरिकांनी देखील वाहतुकीच्या नियमाचे पालन करावेकोणीही तरतुदीचे उल्लघंन केल्यास ते कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतीलअसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केले आहे.

०००००००

विविध उपक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा



 विविध उपक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

चंद्रपूरदि. 1 : नागरिकांच्या निरोगी जीवनासाठी खेळाचे महत्त्व तथा क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावेयासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत कार्यालय व खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल चंद्रपूर येथे 29 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत क्रीडा विषयक उपक्रम घेण्यात आले.

29 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता क्रीडा विषयक जनजागृतीसाठी जेष्ठ खेळाडूंची भव्य रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आलीलोकप्रतिनिधीजेष्ठ नागरिकक्रीडा संघटनासामाजिक संघटनाक्रीडा शिक्षकखेळाडू यात सहभागी झाले होतेदुपारच्या सत्रात खेळाडूंना मार्गदर्शनपरिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आलेराष्ट्रीय व राज्य स्तरावरील पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आलानंतर टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्यासायंकाळी 5.30 वाजता खेळाडूंची रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली.

30 ऑगस्ट रोजी धावपटूंची मेरेथॉन घेण्यात आलीया स्पर्धेत मुलांमधून भूषण अस्वले प्रथमयोगेश वासाडे द्वितीय व आकाश राठोड यांनी तृतीय कमांक प्राप्त केलेतर मुलींमध्ये कामिनी निसाद प्रथमश्रेया येवले द्वितीयतर अफसाना करिमशाह हिने तृतीय क्रमांक पटकाविला. जेष्ठ नागरिक व खेळाडुंकडून योग द्वारा मानसिक शांतीचे पाठ देण्यात आलेसायंकाळी जलतरण स्पर्धा घेण्यात आलीयात 200 मीफ्री स्टाईल प्रकारात मुलीमध्ये मुदूल टोंगे प्रथम व पारुल पिटुंरकर हिने द्वितीय क्रमांक तर मुलांमध्ये स्वचेत चेतन कंदिकुरवार याने प्रथम आणि श्रेयश नितीन टोंगे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.

31 ऑगस्ट रोजी नागरिकांमध्ये सायकलींगचे महत्त्व वाढविण्याकरीता सायकल ऑन संडे स्पर्धा घेण्यात आलीदुपारी वरोरा येथे मल्लखांब स्पर्धा घेण्यात आल्यासायंकाळी व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्यायाशिवाय डेव्हलपमेंट अॅड रिसर्च एज्युकेशन सोसायटीकडून क्रीडा पर्व घेण्यात आलाया अंतर्गत हॉकी स्पर्धाबाइक रॅलीरस्साखेच स्पर्धानेटबॉल स्पर्धा पार पडल्यातसेच वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या. जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकूलसर्व क्रीडा संघटना व सर्व शाळा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंडशिवछत्रपती पुरस्कारार्थी व हॅडबाल खेळाडू कुंदन नायडूमेरा युवा भारत कार्यालयाचे श्री. कुरेशीतालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकर, संदिप उईकेक्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळेनंदू अवारेक्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, प्रभूदास रासेकरअशोक कांबळेविलास गजबेश्री. कन्नाकेश्री. शेखमनोज आखाडे यांच्यासह मेरा युवा भारत कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारीसर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारीसर्व क्रीडा मार्गदर्शकबार्टीक्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.

००००००

‘गीग आणि प्लॅटफॉर्म’ कामगारांनी ई-श्रम नोंदणी करावी


गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम नोंदणी करावी

             चंद्रपूरदि. 1 : गीग कामगारांसमोरील वाढलेली आव्हाने, कामाची खराब परिस्थिती, कामाचे अनियमित तास, अस्थिर उत्पन्न इउदयोन्मुख समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असून त्याकरिता कामगार विभागाच्या वतीने सर्व गीग आणि प्लेटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.

कोण नोंदणी करू शकतात : झोमॅटोस्वीग्गीओलाअर्बन कंपनीफ्लीपकार्टऐमेझॉन व इतर कोणत्याही डिजीटल प्लॅटफॉर्मवर काम करणारे डिलिवरी बॉयचालक र्फ्रिलॅान्सरघरगुती सेवा पुरवठादार व इतर तत्सम असंगटित कामगार

नोंदणीसाठी पात्रता : वय 16 ते 59 असावेआयकर भरणारा नसावा, EPFO व ESIC चे सदस्य नसावे.

आवश्यक कागदपत्रके : आधारकार्डआधारकार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबरपॅन कार्ड

            नोंदणीचे फायदे : भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश

नोंदणीसाठी आपल्या नजीकच्या महा ई-सेवा केंद्रइमारत व इतर बांधकाम कामगार सुविधा केंद्राला भेट द्या किंवा http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-ragistration या लिंकवर स्वतः ऑनलाईन नोंदणी करातुमच्या हक्काचे संरक्षण आणि उज्वल भविष्यासाठी आजच ई-श्रम पोर्टलवर नविन प्लॅटफॉर्म टॅब वर नोंदणी करा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्रवीण कावळे यांनी केले आहे.

संपर्क : अधिक माहितीसाठी सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांचे कार्यालयनविन प्रशासकीय इमारततळ मजला, चंद्रपूर येथे संपर्क करावा.

००००००

जनजाती गौरव दिनानिमित्त कार्यशाळा


जनजाती गौरव दिनानिमित्त कार्यशाळा

         चंद्रपूरदि. 1 :  स्वातंत्र लढ्यातील आदिवासी बांधवांचे योगदानत्यांचा सांस्कृतिक वारसा यांचे स्मरण करून आदिवासी बांधवांना आर्थिकशैक्षणिक व सामाजिक विकासाकरीता उर्जा देण्यासाठी 15 नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरवदिन म्हणून घोषित करण्यात आला आहेतसेच 15 नोव्हेंबर ला भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस असल्याने केंद्र शासनाकडून 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025 हे जनजातीय गौरव वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहेत्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपुर यांच्यावतीने मुख्याध्यापकगृहपाल व वनवासी कल्याण आश्रमच्या अध्यक्ष सदस्यांच्या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आलेया प्रशिक्षण शिबिराला सहाय्यक प्रकल्प अधिकारी, (शिक्षणआर.एमबोगींरवारआर.टीधोटकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वायआरचव्हाण उपस्थित होतेतसेच प्रमुख वक्ता म्हणुन जिल्हा परिविक्षा अधिकारी सुजाता देशमुख (मडावी) उपस्थित होते.

            यावेळी सुजाता देशमुख यांनी शहीद वीर बिरसामुंडा व इतर आदिवासी क्रांतीकारकांच्या इतिहासाला उजाळा दिलाजनजातीय गौरव वर्ष कालावधीत केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढे करावयाच्या कार्यवाही संदर्भात चर्चा व नियोजन करण्यात आलेकार्यक्रमाचे संचालन प्रिती कुत्तरमारे यांनी तर आभार आर.एमबोगींरवार यांनी मानले.

००००००