Search This Blog

Monday, 1 September 2025

विविध उपक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा



 विविध उपक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

चंद्रपूरदि. 1 : नागरिकांच्या निरोगी जीवनासाठी खेळाचे महत्त्व तथा क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावेयासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत कार्यालय व खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल चंद्रपूर येथे 29 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत क्रीडा विषयक उपक्रम घेण्यात आले.

29 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता क्रीडा विषयक जनजागृतीसाठी जेष्ठ खेळाडूंची भव्य रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आलीलोकप्रतिनिधीजेष्ठ नागरिकक्रीडा संघटनासामाजिक संघटनाक्रीडा शिक्षकखेळाडू यात सहभागी झाले होतेदुपारच्या सत्रात खेळाडूंना मार्गदर्शनपरिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आलेराष्ट्रीय व राज्य स्तरावरील पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आलानंतर टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्यासायंकाळी 5.30 वाजता खेळाडूंची रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली.

30 ऑगस्ट रोजी धावपटूंची मेरेथॉन घेण्यात आलीया स्पर्धेत मुलांमधून भूषण अस्वले प्रथमयोगेश वासाडे द्वितीय व आकाश राठोड यांनी तृतीय कमांक प्राप्त केलेतर मुलींमध्ये कामिनी निसाद प्रथमश्रेया येवले द्वितीयतर अफसाना करिमशाह हिने तृतीय क्रमांक पटकाविला. जेष्ठ नागरिक व खेळाडुंकडून योग द्वारा मानसिक शांतीचे पाठ देण्यात आलेसायंकाळी जलतरण स्पर्धा घेण्यात आलीयात 200 मीफ्री स्टाईल प्रकारात मुलीमध्ये मुदूल टोंगे प्रथम व पारुल पिटुंरकर हिने द्वितीय क्रमांक तर मुलांमध्ये स्वचेत चेतन कंदिकुरवार याने प्रथम आणि श्रेयश नितीन टोंगे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.

31 ऑगस्ट रोजी नागरिकांमध्ये सायकलींगचे महत्त्व वाढविण्याकरीता सायकल ऑन संडे स्पर्धा घेण्यात आलीदुपारी वरोरा येथे मल्लखांब स्पर्धा घेण्यात आल्यासायंकाळी व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्यायाशिवाय डेव्हलपमेंट अॅड रिसर्च एज्युकेशन सोसायटीकडून क्रीडा पर्व घेण्यात आलाया अंतर्गत हॉकी स्पर्धाबाइक रॅलीरस्साखेच स्पर्धानेटबॉल स्पर्धा पार पडल्यातसेच वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या. जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकूलसर्व क्रीडा संघटना व सर्व शाळा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंडशिवछत्रपती पुरस्कारार्थी व हॅडबाल खेळाडू कुंदन नायडूमेरा युवा भारत कार्यालयाचे श्री. कुरेशीतालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकर, संदिप उईकेक्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळेनंदू अवारेक्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, प्रभूदास रासेकरअशोक कांबळेविलास गजबेश्री. कन्नाकेश्री. शेखमनोज आखाडे यांच्यासह मेरा युवा भारत कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारीसर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारीसर्व क्रीडा मार्गदर्शकबार्टीक्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment