Search This Blog

Wednesday, 3 September 2025

शंघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता नोंदणी करण्याचे आवाहन

 

शंघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 :  जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मध्ये शंघाई येथे होणार आहेयात सहभाग नोंदवण्यासाठी जिल्हा विभागराज्य आणि देश पातळीवरून स्पर्धा घेतली जाणार असून त्यात कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेतया स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी विविध 63 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.skillindiadigital.gov.in यावर नोंदणी  करावी.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहेया स्पर्धेत भाग घेण्यासाठी 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असावा.  या स्पर्धेसाठी सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालयेएमएसएमई टुल रुम्ससिपेटआयआयटीअभियांत्रिकी महाविद्यालयेआयएचएम हॉस्पिटेलिटी इन्स्टिटयूटकॉर्पोरेट टेक्नीकल इन्स्टिट्युटस्किल ट्रेनिंग इन्स्टिट्युटमहाविद्यालयेमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठएमएसबीव्हीइटीखाजगी कौशल्य विद्यापीठफाईन आर्टस महाविद्यालयेफ्लावर ट्रेनिंग इन्स्टिटयूटइन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकींगइतर सर्व प्रशिक्षण संस्थाकलावाणिज्यविज्ञान शाखेची सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयेतसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थाविविध व्यवसायिक आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छुक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल.

तरी सदर कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून 30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन  सहायक आयुक्त अतडवी यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment