जून-जुलै महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे 7 कोटी 32 लक्ष रुपये अनुदान वाटप सुरू
Ø ऑगस्ट महिन्याचा 12 कोटी 53 लाखांचा निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर
चंद्रपूर, दि. 25 : चंद्रपूर जिल्ह्यात जून - जुलै 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे 289 गावातील 8621.06 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यात बाधित झालेल्या शेतकरी संख्या 13742 आहे. या शेतक-यांसाठी शासनाकडून 7 कोटी 32 लक्ष 99 हजार 414 रुपये अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान वाटप संगणकीय प्रणाली प्रक्रियेद्वारे सुरू आहे. तर
ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14,275.24 हेक्टर जमीन बाधित झाली. यात 16093 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यासाठी लागणारे 12 कोटी 53 लाख 37 हजार 680 रुपयांचा निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. अनुदान प्राप्त होताच तात्काळ मदत वाटप करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
000000000

No comments:
Post a Comment