Search This Blog

Monday, 8 September 2025

स्वाधार योजनेच्या रक्कमेसाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती प्रमाणपत्र सादर करावे


 

स्वाधार योजनेच्या रक्कमेसाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती प्रमाणपत्र सादर करावे

Ø अंतिम मुदत 26 सप्टेंबरपर्यंतविद्यार्थ्यांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिध्द

चंद्रपूरदि. 8: सन 2023-24 मध्ये भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करण्याकरीता उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेमात्र अद्यापही सहायक आयुक्तसमाजकल्याण, चंद्रपूर या कार्यालयाकडे काही विद्यार्थ्यांनी उपस्थिती प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना दुसऱ्या हप्त्याच्या लाभाची रक्कम अदा करण्यात आली नाहीतरी सदर रक्कम 30 सप्टेंबर 2025 रोजी शासन खाती जमा करण्यात येणार आहे.

करिता संबंधित विद्यार्थ्यांनी उपस्थिती प्रमाणपत्र 26 सप्टेंबरपर्यंत सहायक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयडॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनचंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. जे विद्यार्थी 26 सप्टेंबर पर्यंत सन 2023-24 च्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळण्याकरीता उपस्थिती प्रमाणपत्र कार्यालयामध्ये सादर करणार नाही, असे विद्यार्थी स्वाधार योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास सदर विद्यार्थी स्वतः जवाबदार राहीलयाची नोंद घ्यावी.

उपस्थिती प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांची यादी सहायक आयुक्तसमाजकल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच www.acswchandrapur in या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आली आहेअसे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment