Search This Blog

Wednesday, 3 September 2025

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा



 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा

चंद्रपूरदि. 3 : अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारीत धोरणानुसार मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत अनुकंपा उमेदवारांचा मेळावा नियोजन भवन येथे आज (दि.3) पार पडलायावेळी अपर जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक नरेशकुमार बहिरम उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना डॉव्यवहारे म्हणालेशासकीय नोकरीदरम्यान मृत्यु झालेल्या अधिकारी कर्मचा-यांच्या वारसदारांना नोकरीत समाविष्ठ करण्याचे शासनाचे धोरण आहेमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारकांचा मेळावा घेऊन त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश राज्य शासनाकडून आलेत्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेआपल्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार व पात्रतेनुसार आपली नियुक्ती होणार आहेआपल्या पालकांनी शासकीय सेवा केलीयाची जाणीव ठेवून आपल्याला सुध्दा चांगल्या पध्दतीने शासकीय सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहेअसे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात अनुकंपाधारकांसाठी विविध आस्थापनांच्या एकूण 88 रिक्त जागा आहेजिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील असे एकूण 127 अनुकंपाधारक असून आजच्या मेळाव्याला 105 उमेदवार उपस्थित होतेत्यांच्याकडून पसंतीक्रम मागवून त्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली असून प्रत्यक्ष नियुक्ती 15 सप्टेंबर पर्यंत मिळणार असल्याचे अधिक्षक नरेशकुमार बहिरम यांनी सांगितले.

००००००

No comments:

Post a Comment