Search This Blog

Thursday, 18 September 2025

जिल्हा क्रीडा संवाद कार्यक्रम संपन्न

 जिल्हा क्रीडा संवाद कार्यक्रम संपन्न

चंद्रपूरदि.18 : क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयमहाराष्ट्र राज्य तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या निर्देशानुसारजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावीने क्रीडा संवाद कार्यक्रम बँडमिंटन हॉलजिल्हा क्रीडा संकूल येथे घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर जोरगेवारशिवछत्रपती पुरस्कारार्थी कुंदन नायडूबॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डॉराकेश तिवारीॲथलेटिक्स राज्य संघटनेचे सहसचिव सुरेश अडपेवारप्रकाश देवतळेनेटबॉल संघटनेच्या सचिव जयस्वाल मॅडमजिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडसुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील क्रीडा विषयक योगदानयासाठी आर्थिक स्त्रोतसंवादातून विकास या सारख्या विषयांवर आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रीडा संवाद कार्यक्रमाला संबोधित केलेक्रीडा संवाद कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडाविषयक विविध प्रश्नांवर चर्चागटचर्चाक्रीडा तज्ञांचे मार्गदर्शनक्रीडा प्रकारासंबंधीत अडीअडचणीक्रीडा सुविधा व शासनाकडून अपेक्षा या विषयांवर बहुसंख्येने  क्रीडा प्रेमिंनी सहभाग घेतला व चर्चा झाली,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पूंड यांनीसंचालन क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाले यांनी केलेयावेळी जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनापालकक्रीडा पत्रकारक्रीडा प्रेमीक्रीडा शिक्षकखेळाडूविद्यार्थी सहभागी झालेकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरेजयश्री देवकरसंदिप उईकेक्रीडा अधिकारी नंदू अवारेमोरेश्वर गायकवाड सर्व क्रीडा मार्गदर्शक आदींनी  सहकार्य केले.

००००००

No comments:

Post a Comment