Search This Blog

Monday, 22 September 2025

सीटी हायस्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम



सीटी हायस्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूरदि. 22 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सीटी हायर सेकंडरी स्कूलसिटी कन्या विद्यालय व हिन्दी सिटी हायर सेकंडरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भिष्म यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी हायस्कूल चंद्रपूर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पीकुलकर्णी यांनी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केलेत्याचप्रमाणे अॅडमहेन्द्र असरेट यांनी प्राधिकरणाच्या विविध योजना व विधी सहाय्याबाबत माहिती दिलीयाप्रसंगी केअर क्लबच्या सदस्या व शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सानिका तिवारीआचल नैतामअर्चिता टिकेदार व सनिग्धा भक्ते यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला चांदा शिक्षण मंडळाच्या सहसचिव वसुधा रायपुरेसिटी हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका अॅनेट लालसिटी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिमा नायडू व हिन्दी सिटी हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

कार्यकमाचे संचालन मंजुषा घागी यांनी तर आभार शितल तायवाडे यांनी मानलेकार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षकशिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

००००००


No comments:

Post a Comment