Search This Blog

Thursday, 18 September 2025

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 132 उमेदवारांची प्राथमिक निवड

 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 132 उमेदवारांची प्राथमिक निवड

            चंद्रपूरदि.18 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमॉडल करीअर सेंटर आणि महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सगडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 132 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

सदर रोजगार मेळाव्यात साई वर्धा पॉवर प्रालिवरोराओमॅट वेस्ट प्रा.लिचंद्रपूरविदर्भ क्लिक वन सोल्यूशन चंद्रपुरजे.पी.असोशिएटचंद्रपूर एस.बी.आयलाईफ इंन्सूरन्सचंद्रपूरसंसूर सृष्टी इंडिया प्रा.लिचंद्रपूरवैभव इंटरप्रायझेसनागपूरइत्यादी नामवंत कंपन्या उपस्थित होत्या. रोजगार मेळाव्यात 416उमेदवार सहभागी झाले होते त्यापैकी 132 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गडचांदूरच्या सहायक पोलिस निरीक्षक राधिका गायकवाडतर प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरेप्राचार्य शैलेंद्र देवसहायक आयुक्त अनिसा तडवीराहुल बोढे आदी उपस्थित होते.

राधिका गायकवाड म्हणाल्याउमेदवारांना चांगले जीवन जगायचे असेल तर मेहनत करावी. कोणतेही न्यूनगंड न बाळगता मिळेल ते काम करावे. अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न करावे व यश संपादन करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय गोरे म्हणाले, रोजगाराची संधी आपल्या दारी आली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी यांचा लाभ घ्यावा आपल्या व आपल्या कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावावा.

प्रास्ताविकात शैलेंद्र देव म्हणालेचंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्या प्रगतीशिल जिल्हा आहे. आपल्या परिसरात भरपूर कंपन्या आहेस्थानिक उमेदवारांना या संधीचा लाभ मिळावा म्हणून सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या गुणांचा सकारात्मक विचार करावा, असे सांगितले.

मुख्य आयोजक अनिसा तडवी यांनी कौशल्यरोजगारउद्योजकताव नाविन्यता हे कौशल्य आत्मसात करण्याचे चार आधार स्तंभ असून ते उमेदवारांनी आत्मसात करावेया विभागाच्या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा.

००००००

No comments:

Post a Comment