Search This Blog

Wednesday, 3 September 2025

जिल्ह्यातील युवक-युवतींना व्यावसायिक पायलट बनण्याची सुवर्णसंधी

 

जिल्ह्यातील युवक-युवतींना व्यावसायिक पायलट बनण्याची सुवर्णसंधी

Ø प्रशिक्षणासाठी 16 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज

Ø राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान

चंद्रपूरदि. 3 : नागपुर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंदपुर फ्लाइंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपुर जिल्ह्यातील 12 वी उतीर्ण (गणितभौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयासह उत्तीर्णझालेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक  पायलट लायसन्स प्रशिक्षणाकरीता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेसदर प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी करीता राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान (अदांजे 37 लक्षरुपये प्राप्त होणार असून उर्वरित 10 टक्के रक्कम (अंदाजे 4 लक्ष रुपयेनिवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भरावयाची आहेयाबाबतचा अधिक तपशील व  अर्जाचा नमुना www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

असे आहे वेळापत्रक : 1) अर्ज सादर करावयाचा कालावधी 1 ते 16 सप्टेंबर 2025, 2) परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे 24 सप्टेंबर, 3) लेखी परीक्षा 27 सप्टेंबर 2025 रोजी, 4) लेखी परीक्षेचा निकाल  परिक्षा संपल्यानंतर, 5) जिल्हा समितीद्वारे कागदपत्र पडताळणी  30 सप्टेंबर 2025

परीक्षा शुल्क : ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक विद्यार्थी हजार रुपये

लाभार्थी/उमेदवार निकष : 1) उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा असावी. 2) उमेदवाराची वयोमार्यादा किमान 18 वर्षे ते 28 असावी. (01.01.2024 रोजी), 3) 12 वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्रख्‍ रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन अनुसुचीत जमाती करीता किमान 65 टक्के गुणासह व अमागास करीता किमान 75 टक्के गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 4) उमेदवार इयता 10 वी नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातून उतीर्ण झालेला असेल अशा उमेदवारांना ग्रामीण क्षेत्रातील समजण्यात येईल.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे : 1) महाराष्ट्र राज्याचे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाईल (अधिवासप्रमाणपत्र 2) जन्मतारखेचा दाखला 3) 10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट 4) 12 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट 5) मुख्याध्यापक शाळेचे प्राचार्य राजपत्रित अधिकारी यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र 6) चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसिलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र 7) आधार कार्ड, 8) अनुसुचीत जमातीच्या प्रवर्गाकरीता जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र 9) अंतिम प्रवेशपात्र झालेल्या उमेदवारांनी DGCA Approved Medical Practitioner यांच्याकडून Medical Certificate व पोलीस विभागाकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन सादर करणे आवश्यक राहील  10) अंतिम प्रवेश झालेले उमेदवार अनुक्र.8 व 9 मधील प्रमाणपत्रे विहीत मुदतीत सादर करु शकणार नाहीतत्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत : 1) प्रस्तुत पदांकरीता फक्त http://chandaflying.govbharti.org या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतीलइतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहिल. 2) पात्र उमेदवाराला वेब बेस्ड ऑनलाईन अर्ज http://chandaflying.govbharti.org या वेबसाईटद्वारे सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. 3) अर्ज करतांनाशैक्षणिक कागदपत्रेअन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहेतथापिऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहेऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही.

अधिक माहितीकरीता www.chanda.nic.in या संकेतस्थळावर संपर्क करावातसेच इच्छुक पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment