Search This Blog

Wednesday, 3 September 2025

चिमूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात प्रवेश दिन

 चिमूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात प्रवेश दिन

चंद्रपूरदि. 3 : चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून प्रवेश दिन साजरा करण्यात आला.

संस्थेचे प्राचार्य प्रणाली दहाटे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे निदेशक श्रीपावडे यांनी संस्थेच्या कार्यप्रणालीची तसेच रोजगाराच्या संधीबाबत प्रशिक्षणार्थ्यांना माहिती दिलीसंस्थेचे निदेशक श्रीदरवळकर यांनी प्रशिक्षणार्थींना संस्थेची शिस्तकार्यपद्धतीकार्यशाळा व संसाधने यांची ओळख करून दिलीकार्यक्रमाला उपस्थित असलेले निदेशक श्री.गंगावणे यांनी संस्थेमध्ये होत असलेल्या वर्षभरातील सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाप्रसंगी प्रवेशित काही प्रशिक्षणार्थी यांनी मनोगत व्यक्त केलेयावेळी संस्थेच्या गटनिदेशिका बलकी मॅडमतायडे मॅडमपत्तीवार मॅडमश्रीबारसागडेश्री. सोनुनेश्री. ढोले आदींनी संस्थेच्या कार्यप्रणालीची माहिती दिलीकार्यक्रमाचे संचालन श्रीभेंडारकर यांनी तर आभार श्रीकिनेकर यांनी मानलेयावेळी  सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

००००००


No comments:

Post a Comment