Search This Blog

Thursday, 25 September 2025

पावसाळा संपताच दाबगाव येथील मामा तलावाची दुरुस्ती होणार

 पावसाळा संपताच दाबगाव येथील मामा तलावाची दुरुस्ती होणार

Ø जिल्हा जलसंधारण अधिका-याचे स्पष्टीकरण

चंद्रपूरदि. 25 :  मुल तालुक्यातील दाबगाव तुकूम येथील मामा तलावाच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाले आहे. 2 जून 2025 रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतर लगेच तलावाच्या क्षतीग्रस्त भरावाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होतेमात्र जून 2025 अखेरपासून पावसाळ्याला सुरवात झाल्याने सदर तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण करता आले नाही.  त्यामुळे सन 2025 चा पावसाळा संपल्यानंतर लगेच दाबगाव तुकूम येथील तलाव दुरुस्तीचे उर्वरीत काम सुरू करून मे 2026 पर्यंत सदर काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी (.पा.) संदीप खंबाईत यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment