Search This Blog

Thursday, 25 September 2025

माविम मार्फत महिलांसाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम


 

माविम मार्फत महिलांसाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम

चंद्रपूरदि. 25 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमअंतर्गत खुशिया लोकसंचालित साधन केंद्र (सी.एम.आर.सी.) चंद्रपूर यांच्या वतीने जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रमांतर्गत ‘ग्रासरूट चॅम्पियन फॉर स्वयंसहायता समूह महिला महाराष्ट्र’ हा विशेष कार्यक्रम नियोजन भवन येथे पार पडला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माविमचे नागपूर विभागाचे विभागीय सल्लागार राजु इंगळेविभागीय उपजिवीका सल्लागार अमित गाडेजिल्हा समन्वय अधिकारी माविम प्रदिप काठोळेसहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी रुपेश शेंडेजिल्हा प्रकल्प सल्लागार भुषण मुंजेकरमाहिती प्रणाली सल्लागार अमित चवरेखुशिया लोकसंचालित साधन केन्द्राच्या अध्यक्षा सुनिता गणफाडे,  सचिव उज्ज्वला वरखडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला चंद्रपुर तालुक्यातील विविध स्वयंसहायता समूहातील सुमारे अडीचशेच्यावर महिला लाभार्थी उपस्थित होत्याकार्यक्रमात विविध शासकीय योजनांची माहिती थेट महिलांना देण्यात आलीविभागीय अधिकाऱ्यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले तसेच काही योजनांचे अर्ज महिलांकडून तत्काळ भरून घेण्यात आलेया उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनउद्योजकता व आर्थिक प्रगतीसाठी दिशा मिळालीउपस्थित मान्यवरांनी महिलांना शासकीय योजनांचा लाभ घ्याआत्मनिर्भर व्हा आणि प्रगतीचा मार्ग वेगाने चालून दाखवा असे आवाहन केले.

कार्यक्रमाला राज्य परिवहन महामंडळाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण नागपुरेज्ञानेश्वर गावंडेकल्पना राजुरकरराणी खडसेपुरवठा निरीक्षक भारती दोडकेव्यवस्थापक शारदा हुसे तसेच जिल्ह्यातील उपजिवीका सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment