‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 2092 रुग्णांची नोंदणी
Ø उपजिल्हा रुग्णालय मुल येथे आयोजन
चंद्रपूर, दि. 25 : स्वस्थ्य नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 2092 रुग्णांची नोंद करण्यात आली. सदर शिबिरात 10 रुग्णांची अंडवृदधी शस्त्रक्रिया, तसेच 2 रुग्णांवर हरनियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबिरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान करण्यात आले. तसेच 137 सोनोग्राफी करण्यात आले व 21 प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरची सेवा पुरविण्यात आली.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शीतल सोनारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे तहसीलदार मृदुला मोरे, संध्या गुरनुले, हरीश शर्मा, चंदू मारगोनवार, प्रवीण मोहुर्ले, नंदू रणदिवे, आदी उपस्थित होते.
चिमूर येथील दिव्यांग शिबिरात 251 जणांची तपासणी : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग अपंगत्व शिबिरामध्ये 251 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी हत्ती पाय रोग, मानसिक रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल मेडिसिन तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, नेत्रतज्ञ इत्यादी विभागांचे मिळून 191 रुग्णांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे 21 रुग्णांना पाठवण्यात आले. दिव्यांगाच्या तपासणी शिबिरामध्ये डॉ. राहुल भोंगले, डॉ. संदीप भटकर, डॉ. वंदेश शेंडे, डॉ. रोहन कुमरे, राहुल मरसिटीवार यांच्यासह बाळासाहेब चव्हाण, दुर्गाप्रसाद बनकर, , आर. के. घाटोळे, व्ही .सी. मसराम, अचल टेंबरे, सुनिता पडवेकर, सुनयना शीरसागर, या सर्वांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा बजावली.
००००००

No comments:
Post a Comment