जनजाती गौरव दिनानिमित्त कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 1 : स्वातंत्र लढ्यातील आदिवासी बांधवांचे योगदान, त्यांचा सांस्कृतिक वारसा यांचे स्मरण करून आदिवासी बांधवांना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाकरीता उर्जा देण्यासाठी 15 नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरवदिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच 15 नोव्हेंबर ला भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस असल्याने केंद्र शासनाकडून 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025 हे जनजातीय गौरव वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर यांच्यावतीने मुख्याध्यापक, गृहपाल व वनवासी कल्याण आश्रमच्या अध्यक्ष / सदस्यांच्या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला सहाय्यक प्रकल्प अधिकारी, (शिक्षण) आर.एम. बोगींरवार, आर.टी. धोटकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वाय. आर. चव्हाण उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ता म्हणुन जिल्हा परिविक्षा अधिकारी सुजाता देशमुख (मडावी) उपस्थित होते.
यावेळी सुजाता देशमुख यांनी शहीद वीर बिरसामुंडा व इतर आदिवासी क्रांतीकारकांच्या इतिहासाला उजाळा दिला. जनजातीय गौरव वर्ष कालावधीत केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढे करावयाच्या कार्यवाही संदर्भात चर्चा व नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रिती कुत्तरमारे यांनी तर आभार आर.एम. बोगींरवार यांनी मानले.
००००००

No comments:
Post a Comment