Search This Blog

Tuesday, 16 September 2025

17 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रीडा संवाद कार्यक्रम


17 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रीडा संवाद कार्यक्रम

            चंद्रपूरदि.16 : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे विभागस्तरीय क्रीडा संवाद कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनाक्रीडा तज्ज्ञखेळाडूक्रीडा शिक्षकप्रशिक्षकपालक व क्रीडाप्रेमी यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तसेच क्रीडा प्रकाराशी संबंधित अडचणीशासनाकडून अपेक्षा व गटचर्चा इत्यादी विषयांवर 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथील वातानुकुलीत बॅडमिंटन हॉल येथे जिल्हास्तरीय क्रीडा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर जिल्हास्तरीय क्रीडा संवाद कार्यक्रमाकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारातील क्रीडा संघटनाक्रीडा तज्ज्ञखेळाडूक्रीडा शिक्षकप्रशिक्षकपालक व क्रीडाप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment