Search This Blog

Saturday, 13 September 2025

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीत १०६७ प्रकरणे निकाली



चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीत १०६७ प्रकरणे निकाली

चंद्रपूरदि. १३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशानुसार आज दि. १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

लोकअदालतीत एकूण ९५३७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व १५६६२ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५५ प्रलंबित व २१२ दाखलपूर्व अशी एकूण १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.

यामध्ये मोटार अपघात दाव्यांची २८ प्रकरणे निकाली काढून  २ कोटी ५१ लक्ष ४५ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमधून  १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल करण्यात आले. धनादेश अनादरित झालेल्या ६६ प्रकरणांचा निकाल लावण्यात आलातर कामगार व औद्योगिक न्यायालयातील १ प्रकरण निकाली निघाले.

या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीशवकीलन्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहकार्य केलेअशी माहिती  एस. एस. इंगळेसचिवजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर यांनी दिली.

00000000

No comments:

Post a Comment