Search This Blog

Friday, 19 September 2025

पहिल्या दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ


 

पहिल्या दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ

Ø नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान पंधरवड्याला सुरुवात

मुंबई, / चंद्रपूर दि. 19 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर सुरू झाले आहेमहात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबरचालणाऱ्या या उपक्रमांतर्गत 10 लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणीशस्त्रक्रिया व औषधोपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेपहिल्याच दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी होऊन 1,857 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर उपचाराला सुरूवात झाली.

मुख्यमंत्री यांची संकल्पना : संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहेप्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन : राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्येतालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेतगाववस्तीतांडेपाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ मिळत आहेशस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग : या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठसार्वजनिक आरोग्य विभागमहानगरपालिकावैद्यकीय शिक्षण विभागनगरपालिकाइंडियन मेडिकल असोसिएशनमहाराष्ट्र वैद्यकीय परिषदधर्मादाय रुग्णालयेमहात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनामुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्रतज्ज्ञ रुग्णालये व विविध सामाजिक संस्था सक्रिय सहभाग नोंदवत आहेतया सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरत आहे.

तळागाळातील नागरिकांसाठी दिलासा : नेत्ररोग उपचाराचा खर्च गोर-गरीब नागरिकांना परवडणारा नसतोअशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेतविशेषतः ग्रामीण भागातील वृद्धशेतकरीमजूरमहिला व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत आहे.

१७ सप्टेंबर रोजी अभियानातून मिळालेला लाभ : अभियानात सहभागी रुग्णालयांची संख्या – 426,           आयोजित शिबिरांची संख्या – 128, शिबिरांत सहभागी एकूण रुग्णसंख्या - 15,469, पुढील उपचारासाठी संदर्भित रुग्ण -717, मोफत चष्म्यासाठी नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या - 1,590, मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडलेल्या रुग्णांची संख्या - 1,857, इतर नेत्र विषयक शस्त्रक्रियांची संख्या (मोतीबिंदू वगळून) - 127

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून सुरू केलेले ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ प्रेरणादायी व महत्त्वपूर्ण आहेया अभियानातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत नेत्रचिकीत्सा करण्यात येत आहेविशेषतः झोपडपट्टी व भटक्या समाजातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहेजे रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ शकत नव्हतेत्यांनाही मोफत उपचाराची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाली आहेहा उपक्रम तळागाळातील जनतेसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

००००००००

No comments:

Post a Comment