Search This Blog

Thursday, 18 September 2025

सेवा पंधरवडानिमित्त्‍ 1 लक्ष 12 हजार रोपांची लागवड



सेवा पंधरवडानिमित्त्‍ लक्ष 12 हजार रोपांची लागवड

चंद्रपूरदि. 18 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर वनवृत्तअंतर्गत व्यापक वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आलाया अंतर्गत चंद्रपूर वनवृत्तातील तीन वनविभागांमधील 19 परिक्षेत्रात एकूण 1 लक्ष 12 हजार 548 रोपांची लागवड करण्यात आली.

यात चंद्रपूर वन विभागात 37 हजार 999 रोपेब्रह्मपुरी वन विभागात 30 हजार रोपेतर सेंट्रल चांदा वन विभागात सर्वाधिक 44 हजार 549 रोपे लावण्यात आलीया उपक्रमात स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समित्यास्थानिक वन कर्मचारीशाळामहाविद्यालये तसेच विविध औद्योगिक कंपन्यांचा सक्रिय सहभाग राहिलावनविभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या वृक्षलागवडीमुळे जैवविविधतेचे संवर्धनपर्यावरण संतुलन तसेच हरित चंद्रपूर निर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

००००००

No comments:

Post a Comment