Search This Blog

Friday, 3 October 2025

एकरक्कमी व्याज परतावा योजनेस 2026 पर्यंत मुदतवाढ


एकरक्कमी व्याज परतावा योजनेस 2026 पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि.03 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थीकडूनथकीत कर्ज वसुलीसाठी यापूर्वी लागू केलेल्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कम व्याजासह एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस 50 टक्के सवलतीची योजनेच्या प्रथम टप्प्यास दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. 50 टक्के व्याज सवलतीच्या सदर योजनेस आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यानुसारसर्व योजनांतर्गत कर्ज खाते बंद करू इच्छिणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतीलमहामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीना सदर योजनेचा फायदा घेवून कर्ज मुक्त व्हावेयोजनेचा लाभ घेणाऱ्या  लाभार्थीची माहिती विहीत नमुन्यात मुख्यालयास दरमहा सादर करावीअसे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday, 1 October 2025

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा




धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

Ø सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना

Ø भोजनदान तसेच इतर कोणत्याही प्रकारचे स्टॉल रस्त्यावर नको

            चंद्रपूर, दि. 01 : दिनांक 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभुमीवर साज-या होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 1) आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, तहसीलदार विजय पवार, महानगर पालिकेच्या प्र. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुहास पडोळे, यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर शहरात होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी तीन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. यात गर्दीचे योग्य नियंत्रण, स्टॉल व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था. गर्दी नियंत्रणासाठी योग्य नियोजन करावे. तसेच भोजनदान व इतर कोणतेही स्टॉल हे चांदा क्लब ग्राऊंडच्या आतमध्ये लावण्यात यावे. गाड्या तसेच बसेसची पार्किंग व्यवस्था, शहरातील पुतळ्याची स्वच्छता, दीक्षाभुमी परिसराची स्वच्छता, पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा आदी कामे संबंधित विभागांनी गांभिर्याने पूर्ण करावीत.

कार्यक्रमादरम्यान या परिसरातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये,  तसेच रस्त्यावर किंवा झाडांवर लटकणा-या विद्युत तारांची त्वरीत तपासणी करावी. बाहेर गावावरून येणा-या बसेसच्या पार्किंगची ठिकाणे आत्ताच निश्चित करावी. रोडनिहाय पार्किंग प्लान तयार करून त्यानुसार कार्यवाही करावीपार्किंगस्थळ दर्शविणारे फलक लावावेडॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशासह निघणा-या रॅलीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवावामहानगर पालिकेने दीक्षाभुमी परिसरातील आजुबाजुच्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच साफसफाईची कामे करावी. मोबाईल टॉयलेट, हायमास्ट लाईट, कार्यक्रमाच्या ठिकाणी अग्निशमन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात.

रस्त्यावर स्टॉल नको : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून भोजनदानाचे तसेच इतर स्टॉल लावण्यात येतात. सदर स्टॉल रस्त्यावर न लावता चांदा क्लब ग्राऊंडच्या आतमध्ये लावावेत, याची सर्व सामाजिक संघटनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त, सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आपापली जबाबदरी पार पाडावी. येणा-या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सामाजिक संघटना, नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला योग्य सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. 

००००००

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता


नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता

भविष्यामध्ये रस्ता बनविताना परिसरात विकासाची  'इकोसिस्टीमनिर्माण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई / चंद्रपूरदि. 01 : नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीतसेच चंद्रपूर ते मुल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यामध्ये कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची इकोसिस्टीम' (परिसंस्थानिर्माण करण्यात यावीत्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देशही दिलेनागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत या महामार्गाची लांबी वाढवण्यात यावीअशा सूचनाही त्यांनी दिल्याबैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेविकासाचे प्रकल्प पूर्ण करताना कालमर्यादेचे बंधन असावेप्रकल्प रेंगाळला किंवा विलंब झाल्यास किंमत वाढीमुळे  विनाकारण राज्यावर आर्थिक भुर्दंड बसत असतोसध्या राज्यात १० लाख कोटींच्या पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेतया कामांच्या प्रगतीची गती कुठेही कमी पडू देऊ नयेही कामे पूर्ण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहेत्यामुळे ही सर्व कामे नियोजनबद्ध विहित कालमर्यादेत पूर्ण करावी.

राज्यामध्ये यापुढे पायाभूत सुविधांची कामे घेताना ती आधी गतिशक्ती पोर्टलवर आणावीगतिशक्ती पोर्टलवर घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नयेयासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेसिंचन प्रकल्पांची कामे घेतानाही भविष्यात येणाऱ्या अडचणी बघून सुरुवातीपासूनच नियोजन करावेया प्रकल्पांचे भूसंपादन आधीच करून नंतर कामाला सुरुवात करावी.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पांच्या सहज क्रियान्वयनकरिता आपला विस्तार करीत वेगवेगळे विभाग निर्माण करावेपायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी बाह्य स्त्रोतांद्वारे संबंधित क्षेत्रातील तज्ञ मनुष्यबळ घ्यावेपायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांना दिलेल्या आयडीमुळे देयकातील अनियमिततेवर निर्बंध येतीलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाने जुनी देयके अदा करण्यासाठी दायित्वानुसार कालबद्ध कार्यक्रम राबवावाविभागांनी  झालेल्या कामांचीच देयके अदा होतील,  यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवस्था उभारावीदेयकांच्या तपासणीसाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रणा विकसित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेसमृद्धी महामार्गावर स्वच्छतागृहांची व्यवस्था करावीया महामार्गावर 16 ठिकाणी व्यवस्था उभारण्यात येत आहे.  तसेच पेट्रोल पंपफूड मॉलची सुविधा असावी.  स्वच्छतागृहांच्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सल्लागार नियुक्त करावामहामार्गावर 16 पैकी किमान चार ठिकाणी तरी एमएसआरडीसीने पर्यटनाच्या दृष्टीने केंद्र निर्माण करावीराज्यात पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांकरिता निधी उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या  गुंतवणूकदारांच्या निधीतून भूसंपादनासह विकास प्रक्रिया राबवावीपुढील विकासात त्यांचा सहभाग घेऊन निश्चित मोबदला त्यांना मिळण्याची व्यवस्था करावीनिधी उभारणीचे नवीन मॉडेल विकसित करावे.

बैठकीस अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाममनीषा म्हैसकरअपर मुख्य सचिव (वित्तपी गुप्ताप्रधान सचिव (नियोजनसौरभ विजयप्रधान सचिव (विधी व न्यायसुवर्णा केवलेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी  :

1) नागपूर ते चंद्रपूर चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण  महामार्गलांबी २०४ किलोमीटरचंद्रपूर शहराला जोड रस्ता ११ किलोमीटरभूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी.

2) नागपूर ते गोंदिया १६२ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती महामार्गभूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरूअंदाजित किंमत १८,५३९ कोटी.

3) भंडारा ते गडचिरोली चार पदरी द्रुतगती महामार्गलांबी ९४ किलोमीटरअंदाजित एक रक्कम दहा हजार २९८ कोटी.भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू.

००००००००

दिव्यांग बालकांना वैश्विक प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी विशेष शिबीर


दिव्यांग बालकांना वैश्विक प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी विशेष शिबीर

Ø 9, 10, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी आयोजन

चंद्रपूरदि. 01 :  उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीच्या 17 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीत, 19 ऑक्टोबर 2025 पूर्वी दिव्यांग मुलांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांची तपासणी करण्यासाठी  आयुक्तदिव्यांग कल्याण विभागमहिला आणि बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून शिबीर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणजिल्हा परिषद आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुर जिल्ह्यतील सर्व तालुक्यातील वय वर्ष 6 ते 16 वयोगटातील दिव्यांग बालकांकरीता वैश्विक प्रमाणपत्रे व ओळखपत्र देण्यासाठी 9, 10, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजतापासून ट्रेनिंग सेंटरबाहय रुग्णालय 60, जिल्हा सामान्य रूग्णालयचंद्रपूर येथे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

दिव्यांग मुलांची ओळख तपासणीसाठी असे आहे शिबिराचे वेळापत्रक : 1) ब्रम्हपुरीसिंदेवाही आणि नागभीड तालुक्यातील दिव्यांग बालकांकरीता ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता. 2) मुलसावली,  पोंभुर्णा आणि जीवती तालुक्याकरीता 10 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता. 3) राजुरागोंडपिपरीचिमूर आणि कोरपना तालुक्याकरीता 16 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता आणि बल्लारपूरभद्रावतीचंद्रपूर व वरोरा तालुक्यातील दिव्यांग बालकांकरीता 17 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजतासदर तालुक्यांचे शिबीर हे एकाच ठिकाणी ट्रेनिंग सेंटरबाह्य रुग्णालय 60, जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे होणार आहे.    

आवश्यक कागदपत्रे : 1. आधार कार्ड मूळप्रत व एक झेरॉक्स प्रत, 2. जन्म दाखला झेरॉक्स प्रत, 3. वैद्यकिय उपचार बाबतच दस्ताऐवज (CT SCAN/MRI), 4. UDID रजिस्ट्रेशनची प्रत, 5. बाहयरुग्ण नोंदणी केस पेपर, 6. यापूर्वी निर्गमित केलेले मुळप्रत दिव्यांग प्रमाणपत्र.

शिबिराकरिता www.swavlambancard.gov.in या वेबसाईटवर नोंदणी आवश्यक आहेकरिता सेतु केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बालकाची नोंदणी करून घ्यावी व जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबिराचाा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय  साळवे यांनी केले आहे.

००००००

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमात मार्गदर्शन कार्यक्रम



जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमात मार्गदर्शन कार्यक्रम

चंद्रपूरदि. 01 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमदेवाडा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेया कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यासमुपदेशन तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीर्थदर्शन योजनावयोश्री योजना यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आलीतसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार (2005 चा कायदा) या विषयावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

समुपदेशक अतुल शेंद्रे यांनी वृद्धांच्या सामाजिकमानसिक व आरोग्य विषयक अडचणींवर उपाययोजना आणि ताण-तणाव कमी करण्याच्या उपायांवर मार्गदर्शन केलेकार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलायावेळी डी.आरधात्रकज्योती शेंडेपूनम आसेगावकरश्वेता लखावारवैशाली ठाकरेसचिन राउतसंदीप रामटेकेसुजल कांबळेसंदीप वाढईराहुल आकुलवारगणेश खोटेविनोद सोनुलेचेतना खाडीलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावडे यांनी तर आभार प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी मानलेशेवटी सर्व वृद्धांना फळेमिठाई व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

०००००००