Search This Blog

Wednesday, 1 October 2025

दिव्यांग बालकांना वैश्विक प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी विशेष शिबीर


दिव्यांग बालकांना वैश्विक प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी विशेष शिबीर

Ø 9, 10, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी आयोजन

चंद्रपूरदि. 01 :  उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीच्या 17 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीत, 19 ऑक्टोबर 2025 पूर्वी दिव्यांग मुलांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांची तपासणी करण्यासाठी  आयुक्तदिव्यांग कल्याण विभागमहिला आणि बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून शिबीर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणजिल्हा परिषद आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुर जिल्ह्यतील सर्व तालुक्यातील वय वर्ष 6 ते 16 वयोगटातील दिव्यांग बालकांकरीता वैश्विक प्रमाणपत्रे व ओळखपत्र देण्यासाठी 9, 10, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजतापासून ट्रेनिंग सेंटरबाहय रुग्णालय 60, जिल्हा सामान्य रूग्णालयचंद्रपूर येथे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

दिव्यांग मुलांची ओळख तपासणीसाठी असे आहे शिबिराचे वेळापत्रक : 1) ब्रम्हपुरीसिंदेवाही आणि नागभीड तालुक्यातील दिव्यांग बालकांकरीता ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता. 2) मुलसावली,  पोंभुर्णा आणि जीवती तालुक्याकरीता 10 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता. 3) राजुरागोंडपिपरीचिमूर आणि कोरपना तालुक्याकरीता 16 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता आणि बल्लारपूरभद्रावतीचंद्रपूर व वरोरा तालुक्यातील दिव्यांग बालकांकरीता 17 ऑक्टोबर रोजी सकाळी वाजतासदर तालुक्यांचे शिबीर हे एकाच ठिकाणी ट्रेनिंग सेंटरबाह्य रुग्णालय 60, जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे होणार आहे.    

आवश्यक कागदपत्रे : 1. आधार कार्ड मूळप्रत व एक झेरॉक्स प्रत, 2. जन्म दाखला झेरॉक्स प्रत, 3. वैद्यकिय उपचार बाबतच दस्ताऐवज (CT SCAN/MRI), 4. UDID रजिस्ट्रेशनची प्रत, 5. बाहयरुग्ण नोंदणी केस पेपर, 6. यापूर्वी निर्गमित केलेले मुळप्रत दिव्यांग प्रमाणपत्र.

शिबिराकरिता www.swavlambancard.gov.in या वेबसाईटवर नोंदणी आवश्यक आहेकरिता सेतु केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बालकाची नोंदणी करून घ्यावी व जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबिराचाा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय  साळवे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment