Search This Blog

Friday, 3 October 2025

आवेदन पत्र भरण्यासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


 आवेदन पत्र भरण्यासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Ø महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2025

            चंद्रपूरदि. 03 :  महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फतमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे आयोजन रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित आहेसदर परिक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 पर्यंत होतापरंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्यानेआता ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी ते 9 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे ऑक्टोबरच्या रात्री 11.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेयानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाहीसंबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावीअसे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment