जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागाची जाहीर सोडत
Ø 17 ऑक्टोबर पर्यंत हरकती सादर करण्याची मुदत
चंद्रपूर, दि. 13 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागांची जाहीर सोडत 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आली. सदर सोडतीनंतर निश्चित झालेले निवडणूक विभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रारुप आरक्षणाची अधिसुचना जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या माहितीसाठी 14 ऑक्टो 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर प्रारुप आरक्षण अधिसुचनेस ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी जिल्हाधिकारी / तहसील कार्यालयात 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील एकूण जागांचा तपशील : जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागा असून महिलांकरीता आरक्षित जागांची संख्या 28 आहे. यात 1. अनुसुचित जाती (एकूण जागा – 8, महिलांसाठी राखीव - 4), 2. अनुसुचित जमाती (एकूण जागा – 13, महिलांसाठी राखीव - 7), 3. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (एकूण जागा – 15, महिलांसाठी राखीव - 8), 4. सर्वसाधारण (एकूण जागा – 20, महिलांसाठी राखीव - 9)
००००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment