Search This Blog

Friday, 10 October 2025

दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराचे उद्घाटन



दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराचे उद्घाटन

चंद्रपूर,दि. 10 : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेशिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एसएसभिष्म व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळेयांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आलेया वेळी भिष्म यांनी दिव्यांग विभागाच्या अस्थीरोगबालरोगमानसोपचारनाककानघसानेत्र या विभागास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली व सुचना केल्या. 6 से 18 वयोगटातील बालकांची तपासणी सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे 14 व 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत करून दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला मा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळेजिल्हा शल्य चिकित्सक डॉभास्कर सोनारकरनिवासी वैद्यकिय अधिकारी (बाहय संर्पकडॉहेमचंद कन्नाकेशल्य चिकित्सक डॉतारासिंग आडेडॉउल्हास बोरकरडॉअखिल लोहकरेडॉराहुल भोंगळेडॉसंदिप भटकरडॉसायली  दाचेरावडॉसचिन बिलबनेडॉउल्लास सरोदे तसेच दिव्यांग विभागाचे व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

०००००

No comments:

Post a Comment