Search This Blog

Tuesday, 14 October 2025

15 व 16 ऑक्टोबर रोजी ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रमाचे आयोजन


15  16 ऑक्टोबर रोजी जागर संविधानाचा’ कार्यक्रमाचे आयोजन

Ø प्रसिध्द गायीका आकांशा नगरकरप्रसिध्द शाहिरा सीमा पाटील यांचे कार्यक्रम

चंद्रपूरदि. 14 : सांस्कृतिक कार्य विभागसांस्कृतिक कार्य संचालनालयमहाराष्ट्र शासन यांच्या वतीने  भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 व 16 ऑक्टोबर रोजी सायं. 6 वाजता प्रियदर्शनी सभागृहचंद्रपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅडआशिष शेलार यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘जागर संविधानाचा’ हा कार्यक्रमसांस्कृतिक कार्य संचालनालययांच्याद्वारे आयोजित आहेजो भारतीय संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केला जातोया कार्यक्रमांमध्ये संगीतनाट्य  यांसारख्या विविध कलांचा समावेश आहे.

राज्यभरात सुरु असलेल्या या सांस्कृतिक श्रृंखलेचा भाग म्हणून चंद्रपुरात देखील याचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द गायिकासारेगामा फेम आकांक्षा नगरकर आणि त्यांची चमू संविधानावर आधारित गीतांचे सादरीकरण तसेच महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचा जागर गीतांमधून सादर करणार आहेततर 16 ऑक्टोबर रोजी संविधानावर आधारित संगीतमय नाट्याचे सादरीकरण प्रसिध्द शाहिरा सीमा पाटील आणि त्यांचा संच करणार आहेत

या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमांचा आनंद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment