Search This Blog

Friday, 3 October 2025

जिल्ह्यातील 191 गावांमध्ये ‘आदिसेवा केंद्र’ स्थापन


 जिल्ह्यातील 191 गावांमध्ये आदिसेवा केंद्र’ स्थापन

चंद्रपूरदि. 03 :  भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेले आदि कर्मयोगी अभियान’ अंतर्गत प्रत्येक आदिवासी गावात एक आदिसेवा केंद्र स्थापन करणे, हे या अभियानाचे एक महत्त्वाचे अंग आहेत्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 191 गावांमध्ये आदिसेवा केंद्र’ स्थापन करण्यात आले आहेत.

17 सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत आदिसेवा पर्व राबविण्यात आलेया अंतर्गत्‍ आदिवासी बहुल गावांमध्ये ग्राम व्हिजन -2030 आराखडे तयार करण्याचेप्रशासन व नागरिक यांना अधिक जवळ आणण्याचे आणि सेवा वितरणातील तफावत कमी करण्याचे एक पाऊल आहेया केंद्रांमध्ये विविध शासकीय योजनांची माहितीअर्ज-निवेदने स्वीकारणेनागरिकांच्या तक्रारी ऐकणे तसेच त्या तक्रारी पुढील कार्यवाहीस पाठविण्याचे काम होणार आहेआदिसेवा केंद्र हे एक खिडकी योजनेप्रमाणे कार्य करणारे केंद्र असतीलजिथे नागरिकांना विविध सेवा मिळू शकतील. जसे की दस्तऐवज वितरण व सुविधाया केंद्रातून शासकीय योजनांचा लाभ गावोगावी पुरविला जाणार आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी., मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग व प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि तालुका गट विकास अधिकारी यांच्या समन्वयातून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 191 गावांमध्ये सेवा पर्व राबविण्यात आले. या गावांमध्ये आदिसेवा केंद्र स्थापन करण्यात आले असून दर मंगळवारी संबंधित विभागांचे अधिकारी सेवा केंद्रांमध्ये उपस्थित राहतील. या केंद्रांमध्ये आदिवासी नागरिक त्यांच्या अडचणीसूचना व मागण्या मांडतील. अर्ज-निवेदने तपासली जातील व पुढील कार्यवाहीस पाठविली जाईल.

सेवापर्वात घेण्यात आलेले उपक्रम: ग्राम फेरीशिवार फेरी व जंगल फेरीनिवडलेल्या 191 गावांमध्ये गावशिवार फेरी करण्यात आल्या असून त्याद्वारे स्थानिक समस्या समजून घेण्यात आल्या. त्या व्हिलेज वर्कबुक मध्ये नमूद करून आणि त्यावर उपाय निश्चित करून ते ग्राम कृती आराखड्यामध्ये सामील करण्यात आले आहेत.

ग्राम कृती आराखडे : गावातील समस्या व प्रस्तावित सुधारणा यांचे 191 आराखडे ग्रामस्थ व शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने तयार करण्यात येत आहेतयातील बहुतांशी आराखडे पूर्ण झाले आहेतया ग्रामकृती आराखड्यांना ऑक्टोबर ते ऑक्टोबर, 2025 या दरम्यान होणाऱ्या विशेष ग्रामसंभामध्ये ठरावाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येणार आहे.

अभिसरण पध्दतीने योजना अंमलबजावणी : ग्राम कृती आराखड्यांमध्ये सुचविलेली कामे विविध विभागांच्या योजनांमधून पूर्ण करणेठरावाने नोंदलेली कामे आणि नव्या प्रस्तावांचे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे व निधी मागणी करणेआधार कार्डआयुष्यमान भारत कार्डजनधन खातेइतर प्रमाणपत्रे गावोगावी वितरित करणे.

अपेक्षित परिणाम व महत्त्व : आदिवासी भागात शासन-सेवा पोहोचेलनागरिकांचा विश्वास वाढेलग्रामपातळीवर व्हिजन 2030 आराखडा तयार होऊन स्थानिकदृष्ट्या विकास कार्य होतीलतक्रारी व अडचणी त्वरित समजून घेऊन निराकरणाची प्रक्रिया गतीशीर होईल. ‘आदि साथी म्हणजेच आदिवासी समाजातून प्रेरित नेतृत्व तयार होईलविविध शासकीय विभागांतील योजनांचा लाभ तिथे तिथे मिळवून देणेसेवा वितरणातील तफावत कमी करणेराज्य व केंद्राच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळेलअभियानात सहभागी होणारे कर्मयोगीआदि सहयोगीआदि साथी (स्वयंसेवकआदिवासी नेतृत्त्वहे सामाजिक बदलाचे वाहक बनतील.

००००००

No comments:

Post a Comment