Search This Blog

Monday, 13 October 2025

सामूहिक वनहक्क समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण

 सामूहिक वनहक्क समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण

Ø बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांचा अभिनव उपक्रम

चंद्रपूरदि. 13 : बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रचिचपल्ली यांच्या माध्यमातून सामूहिक वन हक्क प्राप्त झालेल्या क्रियाशील समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येत आहेचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 300 क्रियाशील सदस्यांना या प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहेया अनुषंगाने भद्रावती तालुक्यातील सामूहिक वन हक्क समिती सदस्यांसाठी वन अकादमीमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

प्रशिक्षणाची संकल्पना प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन व वन्यजीवतथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधनशिक्षण व प्रशिक्षणएमएसरेड्डी यांच्या प्रेरणेतून साकारण्यात आली आहेप्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांनी सांगितले कीयावर्षी शासनाने महाराष्ट्र हरित अभियान अंतर्गत वनेत्तर जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीची जबाबदारी विविध विभागांना दिली आहेसामूहिक वन हक्क समित्या या अभियानातील एक महत्त्वाच्या भागीदार ठरणार आहेततसेच नुकत्याच मुंबई येथे वनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक वन हक्क समितीच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून बायोथेनॉल निर्मितीची योजना प्रस्तावित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सर्व समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून याच सदस्यांना पुढील काळात प्रत्यक्ष गावात जाऊन बांबूच्या मूल्यवर्धित उपयोगाबद्दलही प्रशिक्षण देण्याचे संस्थेचे नियोजन आहेया प्रशिक्षणादरम्यान सदस्यांना बांबू लागवडीसाठी उपयुक्त प्रजातीउपलब्ध शासकीय योजनालागवडीचे प्रात्यक्षिकबांबूचा मूल्यवर्धित उपयोग व संबंधित कायद्याची माहिती देण्यात आलीभद्रावती तालुक्यातील मुधोलीटेकाडीवडाळामांगलीमासळ या गावांमधील 30 क्रियाशील समिती सदस्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

प्रशिक्षणाचे सत्रसंचालक वनपरिक्षेत्र अधिकारी एडीमल्लेलवार यांनी तर सहायक सत्रसंचालक म्हणून प्रवीण शिवणकर यांनी कार्य पार पाडलेयाशिवाय तज्ञ मार्गदर्शक म्हणून जीसीमेश्राम (सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी), पर्यावरण विकास संस्थेचे शंकर भरडेवनपाल विलास कोसनकर आणि मशीन निदेशक सुमित लिचडे यांनी विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली.

०००००००

No comments:

Post a Comment