Search This Blog

Monday, 13 October 2025

‘मन महोत्सव’ : मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती कार्यक्रम साजरा

 

मन महोत्सव’ : मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती कार्यक्रम साजरा

चंद्रपूरदि. 13 : कर्मवीर मासांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'मन-महोत्सव 2025' हा जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. ‘आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता’ ही या वर्षाची मुख्य संकल्पना होती.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेडॉअनिकेत भडकेडॉनिवृत्ती जीवनेडॉअजय चंद्रीकापूरेमानसिक रोग तज्ज्ञ  डॉसंदीप भटकर उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे यांनीहसाआपल्या भावना व्यक्त करा व तणावमुक्त रहाअसा संदेश दिलातर अध्यक्ष डॉमिलिंद कांबळे यांनी दररोज सकारात्मक विचार करा आणि मानसिक आजारांविषयी बोलाअसे आवाहन केलेया कार्यक्रमात मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

 

आरोग्य तज्ज्ञांनी उपस्थित नागरिकांना मानसिक आरोग्यत्याचे महत्वआणि आताच्या काळातील सामाजिक समस्या याबाबत मार्गदर्शन केलेयावेळी मानसिक आरोग्यावर आधारित ‘देवराई’ हा  विशेष मराठी चित्रपटही दाखविण्यात आला आणि मानसिक आरोग्याविषयी संवाद साधण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन मानसिक रोग विभागप्रमुख डॉमनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉसायली दाबेराव यांनी  केलेसंचालन समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी तर आभार समाजसेवा अधीक्षक उमेश आडे यांनी मानले.

०००००००

No comments:

Post a Comment