Search This Blog

Friday, 17 October 2025

राजुरा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यांत्रिकी वस्त्र धुलाई मशीन



 

राजुरा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यांत्रिकी वस्त्र धुलाई मशीन

चंद्रपूरदि. 17 : राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यांत्रिकी वस्त्र धुलाई मशीन उपलब्ध झाली आहे. या मशीनचा लोकार्पण सोहळा आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेवैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

यांत्रिकी धुलाई पध्दतीमुळे विशेषतः सर्जिकल वस्त्रेधुतल्या-पुसल्याशिवाय रुग्णालयातील लिननग्राऊंडदगड्या बांधणीच्या पाट्या इत्यादीची विश्वासार्हतासाफसफाई आणि निर्जंतुकीकरण आता प्रभावी होईलअसे आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले. तर या नव्या यंत्रसामुग्रीमुळे रुग्णालयातील जंतु संक्रमणाचे धोके कमी होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने औषधोपचाराच्या गतीबरोबर उपचारांच्या परिणामकारकतेत देखील वाढ होईलअसे डॉ. महादेव चिंचोळे यांनी सांगितले.

रुग्णालयात स्वच्छतारोगप्रतिबंधक व्यवस्थापन आणि रुग्णांच्या आरोग्य संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून परिसर स्वच्छ ठेवणेहा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील संपुर्ण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment