Search This Blog

Thursday, 30 October 2025

31 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर पोलिस दलाचे ‘वॉक फॉर युनिटी’

 

31 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर पोलिस दलाचे वॉक फॉर युनिटी

चंद्रपूरदि. 30 : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता वॉक फॉर युनिटी’ या विशेष पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकतासामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणेसरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांप्रमाणे अखंड भारताची भावना जनमानसात रुजवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आाहेशौर्यसेवा आणि एकतेचा संदेश देणा-या रॅलीची सुरुवात श्रीछत्रपती शिवाजी महाराज चौकपटेल हायस्कुल समोरून होणार असून समारोप पोलीस मुख्यालय येथे समाप्त होईलपोलिस अधिकारी/अंमलदारएनसीसी कॅडेटएनएसएस विद्यार्थीइतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीविविध समाजसेवी संघटना तसेच नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment