Search This Blog

Tuesday, 7 October 2025

8 ऑक्टो रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा


ऑक्टो रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

चंद्रपूर, दि. 07 :   जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचंद्रपुर येथे आयोजित करण्यात येत आहे.

             जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविकापदवी  इत्यादी महिला उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेजिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीनेसदर रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे

           सदर रोजगार मेळाव्यामध्ये 500 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहेमेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रतीउपस्थित राहावेअधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क करावा.

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचित करण्याबाबत तसेच उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात भाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त अ.लातडवी यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment