Search This Blog

Tuesday, 7 October 2025

जिल्हाधिका-यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा



 जिल्हाधिका-यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

Ø स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक - 2025

चंद्रपूर, दि. 07 : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाजसे जिल्हा परिषदपंचायत समितीमहानगर पालिकानगर परिषदनगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेतया पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी आज (दि. 7) कायदा व सुव्यवस्थेबाबत यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारमहानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्त्‍ डॉविद्या गायकवाडउपविभागीय अधिकारी अजय चरडेउपजिल्हाधिकारी (निवडणूकशुभम दांडेकरतहसीलदार विजय पवारराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदार आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेनिवडणूक प्रक्रिया निर्भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहेस्थानिक स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाहीयाची दक्षता घेण्यासाठी पोलिस विभाग तसेच इतर यंत्रणांशी योग्य समन्वय ठेवावाआतापासूनच स्थायी निगराणी पथक व फिरते निगराणी पथकाचे नियोजन करावेआपापल्या हद्दितील चेक पोस्ट वर तपासणी नियमितपणे सुरू ठेवावी.

निवडणूक विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे निवडणुकीसंदर्भातील कायदे व नियमांचे अधिका-यांनी वाचन करावेयात कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होणार नाहीयाची दक्षता घ्यावीअन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईलउपविभागीय अधिका-यांनी आपापल्या स्तरावरील तडीपारच्या प्रकरणांचा त्वरीत आढावा घ्यावातडीपारची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीतालुका स्तरावरील दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे घेऊन उपविभागीय पोलिस अधिका-यांना या बैठकीत आमंत्रित करावेअशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

००००००

No comments:

Post a Comment