Search This Blog

Tuesday, 7 October 2025

13 ऑक्टो. रोजी ब्रम्हपुरी पं.स. निर्वाचक गणाच्या सदस्य पदासाठी आरक्षण सोडत


13 ऑक्टोरोजी ब्रम्हपुरी पं.निर्वाचक गणाच्या सदस्य पदासाठी आरक्षण सोडत

चंद्रपूरदि. 07 :   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - 2025 च्या अनुषंगाने पंचायत समिती निर्वाचक गणाच्या सदस्य पदाचे आरक्षण, सोडत पध्दतीने काढून निश्चित करण्यासाठी कार्यक्रम प्राप्त झालेला आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 9(1), महाराष्ट्र जिल्हा परिषद (निवडणूक विभाग व निवडणूक घेण्याबाबतनियम 1962 नियम 2 (व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रमनियम 2025 तसेच न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगाने, जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात अनु.जाती अनुजमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांच्या आरक्षणासह राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.

त्याकरिता ब्रम्हपुरी पंचायत समिती निर्वाचक गणाचे सदस्य पदासाठी आरक्षण सोडत कार्यवाही करण्याकरिता सोमवार दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय ब्रम्हपुरी (नवीन प्रशासकिय इमारत, पहिला माळायेथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आरक्षण सोडतीच्या वेळी उपस्थित रहावेअसे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा ब्रम्हपुरीचे तहसीलदार सतिश मासाळ यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment