Search This Blog

Saturday, 4 October 2025

राणी दुर्गावतींच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवा

 राणी दुर्गावतींच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवा

Ø आदिवासी विकास मंत्र्यांच्या सुचना

चंद्रपूरदि. 04 : भारताच्या इतिहासातील शूरपराक्रमी व प्रजाप्रेमी राणी दुर्गावती यांची जयंती रविवारदिनांक ऑक्टोबर  रोजी आहेराणी दुर्गावती यांनी आपल्या शौर्यपराक्रम व बलिदानाने आदिवासी समाज तसेच समस्त जनतेला प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करून विविध उपक्रम राबवावेअशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिल्या.

राणी दुर्गावती यांचा जन्म ऑक्टोबर 1524 रोजी कलीनजर किल्ल्यावर झालाशौर्यपराक्रम आणि न्यायप्रियतेसाठी त्या प्रसिद्ध होत्यात्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक कार्ये केलीराणी दुर्गावती आजही शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे राणी दुर्गावती यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आदिवासी विभागामार्फत या दिवशी सर्व प्रकल्प कार्यालयआश्रमशाळावसतीगृहे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.

यात सांस्कृतिक कार्यक्रमव्याख्यानेचित्रप्रदर्शननिबंध स्पर्धा तसेच आदिवासी परंपरा व संस्कृतीवर आधारित उपक्रम राबविणे, यामुळे समाजातील नवीन पिढीपर्यंत राणी दुर्गावती यांच्या कार्याचा गौरवशाली संदेश पोहोचेल आणि आदिवासी समाजामध्ये जागरूकता व अभिमानाची भावना दृढ होईलअसेही निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉअशोक वुईके यांनी दिले आहेत.

०००००००

No comments:

Post a Comment