Search This Blog

Wednesday, 15 October 2025

चंद्रपुरात 15 ते 19 ऑक्टो दरम्यान दिवाळी फराळ साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सव

 



चंद्रपुरात
15 ते 19 ऑक्टो दरम्यान दिवाळी फराळ साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सव

चंद्रपूर, दि. 15 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने  महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व दिवाळी फराळ, साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सव - 2025 चे आयोजन 15 ते 19 ऑक्टोबर  या कालावधीत जिल्हा परिषद परिसर व  आझाद बगीचा, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्य व स्वत:मध्ये असलेला आत्मविश्वास वाढविण्यासाठीचा महत्वपूर्ण  उपक्रम आहे. यामुळे महिलांमध्ये संबंधित व्यवसायीक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते.

 

प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये दिवाळी डेकोरेशन करीता लागणाऱ्या विविध वस्तू, पूजेकरिता लागणाऱ्या वस्तू, फराळ,  मसाल्याचे पदार्थ, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, शोभीवंत वस्तू, कापडी बॅग, टेराकोटा चा समावेश आहे. चंद्रपूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनीस भेट दयावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment