Search This Blog

Saturday, 11 October 2025

१३ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळावा

 १३ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळावा

Ø विद्यार्थ्यांना रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. ११ : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना अंतर्गत क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)गडचिरोली येथे  १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असूनहा मेळावा सर्व व्यवसायातील सद्य शिकणारेआजी व माजी आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी यांच्यासाठी खुला आहे.

प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असूनया योजनेद्वारे तरुणांना औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून कौशल्य विकसित करण्याची आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करण्याची संधी मिळते.

मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असूनया सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावाअसे आवाहन बीटीआरआय कार्यालयाच्या सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार  प्रणाली दहाटे व संस्थेचे प्राचार्य  चौधरी यांनी केले आहे.

शिकाऊ उमेदवारीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार संबंधित कंपन्यांतर्फे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

या मेळाव्याचे आयोजन क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थागडचिरोली आणि बीटीआरआयचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असूनइच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा :

* श्री. बावनकर सरगट निदेशकशासकीय आयटीआय गडचिरोली

* श्री. योगेश धवणे सरबीटीआरआयआयटीआय चंद्रपूर.

0000000

No comments:

Post a Comment