दोन दिवसीय जागर संविधानाच्या कार्यक्रमाचा समारोप
Ø चंद्रपुरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर, दि. १७ : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपुरात आयोजित दोन दिवसीय जागर संविधानाच्या कार्यकमाचा समारोप गुरुवारी झाला.
संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी व विभागाचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन भव्य स्वरूपात प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे करण्यात आले.
यावेळी १५ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द गायिका, सारेगामा फेम आकांक्षा नगरकर, स्मित वंजारी, अमित गणवीर आणि त्यांच्या चमुने संविधानावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचा जागर सादर केला. तर, १६ ऑक्टोबर रोजी संविधानावर आधारित संगीतमय नाट्याचे सादरीकरण प्रसिध्द शाहिरा सीमा पाटील आणि त्यांचा संचाने केले. या दोन दिवस चाललेल्या रंगारंग कार्यक्रमाला चंद्रपुरकरांनी रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
०००००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment